इमाजिका
माझ्या दोन्ही मुलींना इमाजिका कडून पासीस मिळाले होते त्यांना तेथे ज्याचे होते ख्रिसमसचे त्यामुळे सगळ्या बसेस ,टॅक्सि बुक झाल्या .त्या दोघी इमाजिका चा विडिओ लॅपटॉप वर पाहत होतो . आणि तो विडिओ मी पुन्हा पुन्हा पहिला मग मी ताबडतोब ठरविले कि आपण पण जायचे .मी मुलींना म्हंटलं चला मी पण येतो तुमच्या बरोबर त्यांना आश्चर्य वाटले आणि आनंद हि झाला .मिस्से काही यायला तयार नव्हती . मग आम्ही च तिघे दुसऱ्या दिवशी निघायचे ठरविले .
आम्हीअलिबाग ला आलेले असल्याने , अलिबाग डेपोत तुन सकाळी ९ वाजताची पेण गाडी पकडली मग पेण ला उतरून सकाळी १०. १५ ची खोपोली गाडी पकडली . त्या बस मधले कंडक्टर "भोसले" चांगले होते ..ते म्हणले कि खोपोली डेपोत ला उतरण्या पेक्षा तुम्ही खोपोली - पाली फाट्याला उतरा . तिथून ऑटो पकडून इमाजिका ला जा. तेथे रिक्षा मिळतात , त्याचे आभार मानून आम्ही पाली फाट्याला उतरलो .
तेथे खरोकरच रिक्षा उभ्या होतया . प्रत्येकी ५० रुपये भाडे ते आकारतात . आमच्या कडून मात्र एका तरुण रिक्षा वाल्याने फक्त १०० रुपये भाडे घेतले .तो ही चांगला होत , वाटेत त्याने आम्हाला अष्टविनायकां पैकी दोन गणपतींची चांगली माहिती दिली , ते म्हणजे महड चा वरदविनायक आणि पाली चा बल्लाळेश्वर . त्याने सांगितले कि ते दोन्ही गणपती तिथून जवळ आहेत . पुढच्या वेळी तास प्रवास करायचा असे आम्ही ठरविले . आणि त्यांनी आम्हाला ईमागी का जवळ आणून सोडले , तेव्हा ११ वाजले होते
काही अंतर चालल्या वर आम्ही ईमागीका च्या प्रवेश द्वारातून आत जाऊन तिकीट खिडकीच्या रांगेत जाऊन उभे राहिलो आम्ही ओंलीने बुकिंग केलेले असल्या मुले , तिकीट काही वेळातच मिळाली .हे चांगले आहे . आणखी एक गंमत म्हणजे वरिष्ठ नागरिकांना एक तिकीट १२७३ रुपयांना पडते . कॉन्सर्ससीन मुळे मी खूप खुश झालो . इतक्यातच आम्ही आत प्रवेश घेतला .
आमच्या आधीच येथे खूप माणसे आत येऊन खेळाचा आनंद लुटत होती .एकंदरीत तिथे मौज माझे चे चित्र पाहून माझ्या तोंडातून "वाव व्हेरी nice " असा उदगार माझ्या तोंडून निघाला .आणि आपण कधी याचा आनंद घेतो असे आम्हाला झाले .
ईमाजीका हे कित्येक एकरात पसरलेले असून तेथे विविध थरारक खेळ चालू असतात . तुमच्या मनाची तयारी केलीत तर लहान मुले,तरुण ह्यांच्या प्रमाणे तुम्ही हि त्याचा उपभोग घेऊ शकता , हे स्व अनुभवाने सांगतो ..
खर सांगायचे तर तुम्ही हि तरुण व्ह्याचे आणि गंमती ओरडा आरडा करून करून वेग वेगळे तोंडाने आवाज करून खेळाचा आनंद घायचा त्यामुळे मनात भीतच येत नाही आणि मग थ्रिल अनुभवल्या मिळते .
आज मी येथेच थांबतो , पण "picture अभि बाकी हे मेरे दोस्त ". तेव्हा पुढच्या पोस्ट ची वाट पहा
नमस्कार
Comments